जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम संकेतस्थळ उद्घाटन
चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या विशेष प्रसंगी शाळेच्या अधिकृत संकेतस्थळाचे लॉन्चिंग करण्यात आले. संकेतस्थळावर शाळेची माहिती, विविध उपक्रम आणि ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि संगणक अभियंता श्री. रहमतुल्ला इनामदार यांच्या पुढाकाराने आणि तांत्रिक मार्गदर्शनाने वेबसाइट विकसित करण्यात आली.